अनिल पाटील यांनी अपक्ष चौधरींचा ३३ हजार तर काँग्रेसच्या शिंदेंचा ९५ हजारांनी केला पराभव
अमळनेर (विशेष प्रतिनिधी) :- येथील अमळनेर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल भाईदास पाटील यांचा दुसऱ्यांदा विजय झाला असून अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांचा ३३ हजार ४३५ मतांनी व महाविकास आघाडीचे डॉ. अनिल शिंदे यांचा ९५ हजार ६४७ मतांनी पराभव केला आहे.
आता सर्व २४ फेऱ्या संपलेल्या आहे. अनिल पाटील यांना २४ व्या फेरीअखेर १ लाख ९ हजार ४४५ तर शिरीष चौधरी यांना ७६ हजार १० मते मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे डॉ. अनिल शिंदे यांना १३ हजार ७९८ मते मिळवून लक्ष वेधून घेतले आहे. अमळनेर तालुक्यातील विविध गावागावांत महायुतीकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे.