अहमदनगर ( वृत्तसंस्था ) – अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला लागलेल्या आगीच्या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. आणखी एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती देखील त्यांनी दिली .
आयसीयू विभागात 17 जणांवर उपचार सुरु होते. हे सर्व रुग्ण कोरोनाबाधित होते. काही रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.
अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला आग लागल्यानं 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आगीत काही रुग्ण भाजल्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. रुग्णालयात अग्निशमन दल पोहोचले असून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय.
अहमदनगर जिल्हा शासकीय . रुग्णालयाला लागलेल्या आगीत अनेक जण भाजले असल्याची शक्यता असल्यानं मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. रुग्णालयाच्या तळमजल्यावर आग लागली. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समोर आलेलं नाही.यानिमित्त शासकीय रुग्णालयातील आग प्रतिबंधक यंत्रणांच्या कार्यक्षमतेचा मुद्दा निर्माण झालाय.
जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीत 20 जणांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती आहे. आयसीआयूला लागलेल्या आगीत 12 ते 15 जण जखमी झाले ही माहिती कळताच अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ तातडीनं कोल्हापूरहून नगरकडे निघणार आहेत.
अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे तातडीने अहमदनगरच्या दिशेने निघाले आहेत. शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती असून घटनास्थळी जाऊन पाहणी करणार असल्याचं हसन मुश्रीफ म्हणाले.