एकलव्य संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
जळगाव (प्रतिनिधी ) आदिवासी समाजाच्या मूलभूत अधिकार व हक्कांमध्ये कोणीही हस्तक्षेप अथवा राजकारण करू नये, व आदिवासी प्रशिक्षण व संशोधन संस्थेवर आदिवासी अधिकारी म्हणून राजेंद्र भारूड यांची नियुक्ती करावी अथवा त्यांच्या जागेवर आदिवासी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी या मागण्याचे निवेदन एकलव्य संघटनांतर्फे आज २२ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे कि जात पडताळणी कार्यालय व आदिवासी विभागातील सर्व कार्यालय आदिवासीच्या विकासासाठी असून राजकारण करण्यासाठी नाही. तसेच नंदुरबार व धुळे येथील जात पडताळणी समिती ही कोणत्याही परिस्थितीत जळगाव येथे आणू नये , तिथेच नियमित करावे व जळगाव येथे कोणत्याही स्वरूपाची पडताळणी समिती अथवा प्रतिनिधी पाठवू नये. अशा विविध मागण्या एकलव्य संघटनातर्फे करण्यात आल्या. निवेदनदेतेवेळी याप्रसंगी एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय सोनावणे,निवृत्ती पवार, पिंटू सोनावणे,राहुल ठाकरे आदी उपस्थित होते.