जळगाव ( प्रतिनिधी ) – आदिवासी विकास खात्याच्या न्यूक्लिअट बजेट योजने अंतर्गत इष्टांक वाढवून मुदतवाढ मिळावी यासाठी नाशिकच्या आयुक्त कार्यालयाला यावलच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी यांना भिल समाज विकास मंच व आदिवासी एकता परिषद यांच्याकडून निवेदन देण्यात आले
या निवेदनात म्हटले आहे की , जळगांव जिल्ह्यातील आदिवासी लोकसंख्या 2011 सालातील जनगणनेनुसार 6 लाखांपेक्षा जास्त असून सद्यास्थितीत ही लोकसंख्या अडीच ते तीन पट झाली आहे तरीदेखील योजना लाभाचा इष्टांक अद्याप जुनाच व अशोभनिय असून तो इष्टांक जळगांव जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या लोकसंखेनुसार वाढवून देण्यात यावा
हे निवेदन देतांना करण सोनवणे ( जिल्हाध्यक्ष आ.ए.प ), दिपक अहिरे (जिल्हाध्यक्ष भिल समाज विकास मंच ), सल्लागार बी आर तडवी, यशवंत अहिरे, समाधान मोरे, निहाल सोनवणे, दिपक ठाकरे, इश्वर सोनवणे, विजय ठाकरे, विकास गायकवाड व समाजबांधव उपस्थित होते