मुक्ताईनगर (प्रतिनिधी)- मुक्ताईनगर पोलिस स्टेशन अंतर्गत अंतुर्ली दूरक्षेत्र येथे आज दि. 28 सप्टेंबर रोजी सध्याकाळी 7 वा चे सुमारास गावठी हातभट्टी दारू वर पीएसआय निलेश सोळंके यांनी अवैधरित्या गावठी हातभट्टीची तयार दारू ही स्वतः जवळ बाळगून अवैधरित्या विक्री करत असताना मिळाला.
सदर कारवाई पीएसआय निलेश सोळंके यांच्या टीमने रेड करून गावठी हातभट्टी ची दारू विक्री करत असताना गजानन प्रकाश पांडे हा १२० लीटर ६००० रूपये कीमतीची दारू विक्री करत असताना मिळून आला उप विभागिय अधिकारी नरेंद्र पिंगळे व पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय निलेश सोळंकी, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष चौधरी, पोलीस नाईक सुनील बडगुजर पोलीस शिपाई सुनील नागरे, होमगार्ड भूषण खडसे, ऋषिकेश बारी, सोपान बेलदार या टीमने रेड करून गावठी दारूचा आरोपी ताब्यात घेतला व रात्री उशिरा पर्यंत गुना दाखल दाखल करण्याचे काम चालू होते.