जळगाव (प्रतिनिधी ) ;- येथील हिंदी विभाग-प्रमुख डॉ.प्रदीपकुमार सुरेश कळसकर यांनी हिंदी क्षेत्रात गेली 16 वर्ष केलेले योगदान, त्यांची सेवा लक्षात घेता 1 सप्टें. रोजी ठाणे-मुंबई येथे “नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम” द्वारा, मान्यवरांच्या हस्ते “आदर्श शिक्षक पुरस्कार-2024” देवून गौरविण्यात आले.. चंद्राई बिग बिलिनियर मल्टीपर्पज फाउंडेशन इंडिया च्या माध्यमातून भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीच्या ५ सप्टेंबर या शिक्षक दिनाचे औचित्य साधत राज्यस्तरीय आदर्श गुरुजन पुरस्कार-2024 देण्यात आला..
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुनील भास्कर पाटील (स.आयुक्त स्काऊट गाईड ) .राजेंद्र जयसिंग राजपूत ( संचालक एसएससी बोर्ड, मुंबई),संस्थेचे चेअरमन श्रीराम पाटील , सेक्रेटरी .स्वप्नील पाटील, जॉइंट सेक्रेटरी प्रमोद पाटील , मुख्याध्यापक जनार्दन धनगर , उप-मुख्याध्यापकदिपक महाजन ,व्यवस्थापक किरण दुबे व संचालक मंडळ तसेच शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.