रावेर तालुक्यातील निंभोरा गावाजवळ घटना
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील निंभोरा येथील ३३ वर्षीय तरुणाचा सावद्याहून निंभोरा येथे परत येत असताना वाघोदा येथील श्री शनी मंदिराजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक देत घटनास्थळावरून पोबारा केला. घटनेमध्ये तरुणाचा मृत्यू झाला असून सावदा पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
कपिल अशोक वारके (वय ३३, माऊली मेडिकल, निंभोरा ता.रावेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील,एक भाऊ असा परिवार आहे. (केसीएन)कपिल हे निंभोरा येथील न्यू इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक ए. एच. वारके यांचा मोठा मुलगा आहे. मयत कपिल वारके यांचा मेडिकल व्यवसाय आहे.
निंभोरा येथे घरी जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने जबर धडक दिली या धडकेत त्यांच्या जागीच मृत्यू झाला.(केसीएन)त्यांना रावेर येथे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले. पुढील तपास सावदा पोलीस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक अशोक गर्जे व सहकारी करीत आहेत.