• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 11, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई, ममुराबादसह म्हसावद येथे खळबळ

जळगाव प्रतिनिधी : वाळू वाहतूक करणारा डंपर सोडून देण्यासाठी आणि त्यावर कारवाई न करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ममुराबाद येथील तलाठी आणि म्हसावद येथील मंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई दि. ११ फेब्रुवारी रोजी जळगाव शहरात करण्यात आली.

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या लोकसेवकांमध्ये सदानंद व्यंकटी मुंडे (वय ३४), तलाठी, सजा ममुराबाद, ता. जि. जळगाव (वर्ग-३) व अभिजित नामदेव येवले (वय ३९), मंडळ अधिकारी, सजा म्हसावद, ता. जि. जळगाव (वर्ग-३) यांचा समावेश आहे. तक्रारदार हे वाळू वाहतुकीचा व्यवसाय करतात. दि. ४ फेब्रुवारी रोजी रात्री गस्तीवर असताना तलाठी सदानंद मुंडे यांनी वाळूने भरलेला डंपर पकडला होता. मात्र, मंडळ अधिकारी अभिजित येवले यांनी फोनवरून दिलेल्या सूचनेनुसार तो डंपर कारवाई न करता सोडून देण्यात आला. या उपकाराच्या बदल्यात आणि पुढील कारवाई टाळण्यासाठी मुंडे आणि येवले या दोघांनी मिळून तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार नोंदवली. या तक्रारीची पडताळणी केली असता, तडजोडीअंती ३० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. एसीबीच्या पथकाने जुने जळगाव परिसरातील अभिजित येवले यांच्या घराच्या खाजगी कार्यालयात सापळा रचला. यावेळी तलाठी सदानंद मुंडे यांना ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले.
झडतीमध्ये सदानंद मुंडे यांच्याकडे रोख ४०,२०० रुपये आणि एक विवो कंपनीचा मोबाईल फोन तर अभिजित येवले यांच्याकडे रोख ७,६०० रुपये आणि एक विवो कंपनीचा मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा पथकात योगेश ठाकूर (पोलीस उपअधीक्षक), तपास अधिकारी स्मिता नवघरे (पोलीस निरीक्षक), श्रीमती रेश्मा अवतारे, सुरेश पाटील, बाळू मराठे, राकेश दुसाने, प्रदीप पोळ आणि चंद्रशेखर चौधरी यांचा समावेश होता. कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्वरित टोल-फ्री क्रमांक १०६४ किंवा जळगाव एसीबी कार्यालयाशी ०२५७-२२३५४७७ या क्रमांकावर संपर्क साधावा.


 

 

Previous Post

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

Next Post

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले... मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद
1xbet russia

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन
1xbet russia

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण
1xbet russia

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon