जळगाव [प्रतिनिधी] – महाबळमधील दुकान नावावर करुन देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकडलेल्या मेहरुणचा तलाठी सचिन माळी याला गुरुवारी न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी तलाठी कार्यालयात माळी याला लाच घेताना रंगेहात अटक केली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुरुवारी तपासाधिकारी नीलेश लोधी यांनी न्या.आर.जे.कटारिया यांच्या न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील प्रदीप महाजन यांनी काम पाहिले