जळगाव (प्रतिनिधी) :- जुने जळगांव येथे मोफत आयुष्यमान भारत कार्ड आणि मतदान नोंदणी अभियान सुरु आहे. माजी उपमहापौर सुनिल वामनराव खडके यांच्यातर्फे आज सोमवारी १ जानेवारी रोजी नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. हे अभियान मंगळवारीदेखील सुरु आहे. अभियानासाठी आरोग्यदूत पैलवान शिवाजी पाटील हे मदत करीत आहेत. तरी नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.