यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील वाघोदा येथील एका पस्तीस वर्षीय शेतकऱ्याने पाटचारी परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली.
या मयत विवाहीत शेतकऱ्याचे नाव जगदीश हिरामण पाटील (वय३५) असे आहे. त्याने मृत्युपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. वाघोदा येथील जगदीश हिरामण पाटील या तरुणाने सकाळी शेती कामाला जात आहे असे सांगून घरून निघून गेला होता. जगदीश हा सायंकाळ झाली तरी घरी परत आला नसल्याने तेव्हा त्याच्या कुटुंबाने शोधाशोध केली साकळी शिवारातून मार्गस्थ होणाऱ्या पाटचारी जवळ जगदीश पाटील हा झाडाला गळफास घेऊन मृतावस्थेत आढळून आला.घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.
पोलीस पाटील अशोक पाटील, वाघोदाचे माजी पोलीस पाटील, प्रकाश पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर पाटील, जळगावचे मधुकर पाटीलसह मयताचे नातेवाईक पोलीस ठाण्यात दाखल झाले. मयताने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे. त्यात त्याने मी माझ्या वैयक्तिक आयुष्याला कंटाळून आत्महत्या करीत आहे. माझ्या आत्महत्येत कोणाचाही काहीही संबंध नाही असा उल्लेख केला आहे. तरी कोणाला त्रास होईल असे वागू नये ही विनंती. असे मृत्यूपूर्व चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. या तरुणाच्या अशा आत्महत्येमुळे गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे