जळगाव (प्रतिनिधी) – मुळजी जेठा महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंटा ऑफ योग नॅचरोपॅथीच्या संचालिका प्रा. आरती गोरे यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांना डॉ. विश्वास मंडलिक यांचे मार्गदर्शन लाभले.
कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्व विद्यालयाचा ऑनलाइन दीक्षांत समारोह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, योग गुरू रामदेव बाबा, कैवल्यधाम लोणावलाचे सचिव ओम प्रकाश तिवारी यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. डॉ. आरती गोरे सुरूवातीपासून सोहम डिपार्टमेंट ऑफ योग नॅचरोपॅथी विभाग सुरूवातीपासून यशस्वीपणे संभाळत आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक संशोधन प्रकल्प सादर केले आहे. कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्व विद्यालयाचा ऑनलाइन दीक्षांत समारोहात त्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांना डॉ. विश्वास मंडलिक यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचा कुलगुरू प्रा.पी.पी. पाटील यांनी गौरव केला.