नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) : २९ ऑक्टोबर हा जागतिक लखवा दिन म्हणून साजरा केला जातो जातो. यानिमित्ताने अग्रवाल चौकात असलेल्या डॉक्टर निलेश किनगे यांच्या ॲक्साॅन ब्रेन हॉस्पिटल येथे आज रविवारी सकाळी ११ वाजता विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या वर्षाची थीम आहे आपण सर्व मिळून लकव्यावर विजय मिळवू शकतो. (Together we are greater than stroke) दर मिनिटाला मेंदूचा रक्तपुरवठा थांबला तर १.९ मिलियन म्हणजे १९ लाख सेल्स मरतात, त्यामूळे लखवा होऊ शकतो अचानक चेहरा तिरपा होणे, हात किंवा पाय कमजोर होणे, बोलायला त्रास होणे, चालतांना तोल जाणे, अचानक डोळ्याची दृष्टी जाणे, हे सर्व लखव्याचे लक्षणे असू शकतात. अशा वेळेस त्वरीत तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करणे आवश्यक आहे. या मागील वैद्यकीय कारण (सायन्स) आपण समजून घ्या आणि अशी लक्षणे दिसल्यास आणि योग्य ती कृती केल्यास आपण लखव्यावर विजय मिळवू शकतो. लखवा होण्यामागील कारणे उच्च रक्त दाब, डायबेटिस, स्मोकिंग, आहार अशी बरीच कारणे असू शकतात.
गेली ६ वर्ष डॉ निलेश किनगे (एम डी, डिएम) यांचे ॲक्साॅन ब्रेन हॉस्पिटल रुग्ण सेवेत कार्यरत आहे. मेंदू आणि लकव्या संदर्भात तसेच हाता, पायांच्या नसांसंदर्भात सगळ्या आजारांवर योग्य मार्गदर्शन व उपचार केले जातात.
या निमित्ताने २९ ऑक्टोबर रविवारी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत मेंदू व नसांचे विकार यावर एक शिबिर आयोजित केले असुन यात मेंदु व नसांचे विकार यावर मार्गदर्शन केले जाईल. तसेच सि टी स्कॅन, ई ई जी, आर टी एम एस, सोनोग्राफी, एक्सरे, या तपसण्या माफक दरात केल्या जातील. आर टी एम एस, हि नवीन उपचार प्रणाली उपलब्ध झाली आहे, त्याला रिपीटेटीव. ट्रॉन्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टीम्यूलेशन असे म्हणतात. मेंदूला मॅग्नेटीक प्रवाहाच्या सहयाने मेंदूतील सेल्स स्टिम्युलेट करुन त्यांना योग्य ती दिशा देणे या मुळे हि ॲडव्हान्स एफ डी आय ॲप्रुवड थेरेपी आपल्या येथे उपलब्ध झाली आहे. जुन्या लकव्याच्या पेशंटला हि त्याच्यामुळे फायदा होतो.
लखवा झाल्यास रुग्णाला ताबडतोब हॉस्पिटलला नेल्यास मेंदूतील रक्ताची झालेली गाठ (clot) पेशंट TPA हे इंजेक्शन देऊन उपचार करण्याची सुविधा सुद्धा २४ तास उपलब्ध आहे.
आपल्या येथे मेंदूला मार लागणे,(रोड अपघात), फिट्स येणे, बेशुद्ध होणे, वारंवार चक्कर येणे यावर सुद्धा ईलाज होतो.येथे मेंदुरोग तज्ञ व अनुभवी डाॅ. निलेश किनगे (एम डी, डि एम, एफ आय एन एस, इन्टरव्हे॔न्शनल न्यूरोलॉजिस्ट उपलब्ध असतात.