जळगाव (प्रतिनिधी) – येथे जळगाव आरोग्य भारती पर्यावरण कार्यशाळा १३ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. त्याची बैठक पार पडली. बैठकीत देवगिरी प्रांत अध्यक्ष डॉ सिगेदार ( जालना), उपाध्यक्ष डॉ. पाटवदकर (संभाजीनगर), डॉ. लीना पाटील तसेच संघटन सचिव आप्पाजी कुलकर्णी यांचे मार्गदर्शन झाले. बैठकीत व्यवस्थात्मक चिंतन व तयारीचा आढावा घेतला गेला. बैठक डॉ. के डी पाटील हॉस्पिटल येथे पार पडली.
बैठकीत प्रत्येक जिल्ह्यातील २ कार्यकर्ते येण्यासाठी प्रयत्न करणे, भोजन व्यवस्था, यातायात व्यवस्था, स्टेज सजावट, ध्वनी व्यवस्था, इ वर चर्चा झाली. यासंदर्भात बैठक घेऊन जबाबदारी निश्चित करण्यासाठी सर्वांनी यावे. तसेच पर्यावरण कार्यशाळेसोबतच प्रदर्शनी आयोजित करण्यावर ही चर्चा झाली, तसेच पर्यावरण विषयात आपण अजून काय काय करू शकतो अशी चर्चा होऊन त्यात कागदी पिशव्या, कापडी पिशव्या, वृक्षारोपण व संवर्धन हे विषय चर्चिले गेले.
या बैठकीत जळगाव कार्यकारिणीतील डॉ. लीना पाटील ,डॉ. विनीत नाईक, डॉ. शरयू विसपुते, डॉ. सरिता महाजन, डॉ. पुष्कर महाजन, डॉ. वैभव पाटील, लाठी, कृणाल महाजन, विजय जाधव, उपासनी, याज्ञीक, डॉ. देशमुख आदी उपस्थित होते.