औरंगाबाद (वृत्तसनाथ) – औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद शहराचं नामांतर करण्याच्या हालचाली ठाकरे सरकारकडून सुरु झाल्या आहेत. त्यासाठी महापालिकेत आत्तापर्यंत झालेले ठराव, न्यायालयात प्रलंबित प्रकरणे या संदर्भातला सविस्तर अहवाल राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या संदर्भामध्ये माहिती गोळा करायला सुरुवात केली आहे.औरंगाबाद महापालिकेने 11 जून 1995 मध्ये हा ठराव मंजूर करुन शासनाकडे पाठवला होता. शासनाने नोव्हेंबर 1995 मध्ये संभाजीनगरचे अधिसूचना प्रसिद्ध केली होती. त्यानंतर मुस्ताक अहमद यांनी उच्च न्यायालयात याचिकेला आव्हान दिलं होतं. त्यानंतर 2001 मध्ये विलासराव देशमुख यांच्या सरकारने राज्य शासनाची अधिसूचना मागे घेतली. शिवसेनेचे महापौर सुदाम सोनवणे यांच्या काळात 1999 मध्ये आणि महापौर अनिता घोडेले यांच्याकडे 2011 मध्ये संभाजीनगरचा ठराव मंजूर करण्यात आला होता.
राज्य शासनाच्या आदेशानुसार संभाजीनगर बदलाच्या सर्व माहिती संकलनाचे काम सुरू आहे. शहराचे नामकरण करण्याबाबत केंद्रीय मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार आवश्यकत ती परिपूर्ती करून सविस्तर प्रस्ताव तयार करणे, पूर्वीच्या प्रस्तावातील त्रुटी दूर करणे, न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिका सद्यस्थितीची माहिती एकत्र करणे, रेल्वे आणि पोस्ट खाते यांचे ना हरकत प्रमाणपत्र कागदपत्र जमा करणे याचं काम सुरू आहे.