सध्या धावपळीच्या युगात हृदयावर खूपच ताण येतो. शहरी जीवनशैली हृदय रोगाचे मुख्य कारण आहे. हृदयाचे आजार नको असतील तर काही गोष्टींमुळे लक्ष द्यावेच लागेल. अशा नवसूत्रींबद्दल आज जाणून घ्या.
दूध पिणे फायद्याचे : दूध, ताक किंवा दही यासारखे दुग्धजन्य पदार्थ नियमित घेतल्यास रक्तदाब नियंत्रित राहतो.
व्यायाम : दिवसभरातून फक्त अर्धा तास योगासन, एरोबिक्स केल्यास हृदयाचे ठोके नियंत्रित राहतात.
नॉनव्हेज : तुम्ही मांसाहारी असाल तर मटन चिकनऐवजी मासे खा.
ज्यूस : फळांचा रस प्या. ज्यूस कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ देत नाही.
सॉस सलाद : सलाद, सूप अथवा भाज्यांवर काळा सोयाबीन सॉस टाकून खा. याशिवाय काळ्या सोया सॉसमध्ये अँटीऑक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणावर असतात.
दररोज हसा : दररोज कुटुंबात असताना किंवा नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी असताना खळाळून हसा. त्याचा जादूसारखा परिणाम दिसून येईल, परंतु हास्य मनापासून असावे. उगीचच ही ही करणे म्हणजे हास्य नव्हे!
पुरेशी झोप आवश्यक : दररोज कमीत कमी ५ तास झोप आवश्यक आहे. झोप पूर्ण झाल्याने हार्मोन, शुगर व रक्तदाबावर प्रभाव पडतो.
प्राणायाम : बाबा रामदेव यांनी तरुण पिढीला प्राणायामाची सवय लावली. रोज झोप फक्त १५ मिनिटे हळूहळू खोल श्वास घेणे म्हणजे प्राणायाम. यामुळे औषधांची गरजच भासत नाही.
शास्त्रीय संगीत : मधुर संगीत शरीर लयबद्ध बनवते, पण संगीत शांत व गंभीर असावे, कर्णकर्कश नव्हे.