जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगावहून मेहकरकडे निघालेल्या बसने मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकल्सवर जागीच ठार झाला. हा अपघात आज दुपारी अडीच वाजता नशिराबाद रेल्वे उड्डाणपुलाजवळ घडला. रोशन मनोहर कोंगळे (20, झोडगा, ता.मलकापूर, जि.बुलढाणा) असे मृत तरूणाचे नाव आहे.
रोशन कोंगळे हा तरूण 6 जुलै रोजी दुपारी त्याच्या मोटारसायकलने भुसावळकडून जळगावकडे येत असतांना नशिराबाद रेल्वे उड्डाण पुलावर समोरून येणारी जळगावकडून मेहकरकडे भुसावळमार्गे जाणारी भरधाव बस (एम.एच.40 ए.क्यू.6270) ने धडक दिली. या अपघातात रोशन कोंगळे जागीच ठार झाला. अपघाताची माहिती मिळताच नशिराबादच्या पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह रूग्णवाहिकेने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . .