जळगाव (प्रतिनिधी) – नुकतेच पिंपरी चिंचवड सायकलिस्ट ग्रुपने आदेक्स क्लब (फ्रान्स) आणि आदेक्स इंडिया राडोनियार्समार्फत आयोजित ३०० किमी
सायकलिंग इव्हेंटचे आयोजन केले होते. या इव्हेंटमध्ये जळगाव सायकलिस्ट क्लब सदस्य आणि पेंथोलोंजिस्ट डॉ अनघा चोपडे यांनी सहभाग नोंदवला होता त्या 300 किमी सायकलिंग इव्हेंट पुर्ण करणारी जळगावची पहिली महिला ठरल्या आहेत .

त्यांना या स्पर्धेसाठी 20 तासचा कालावधी देण्यात आला होता. वाकड येथून इव्हेंटची सुरवात झाली तेथून बारामती, फलटण,लोणंद रोड, शिरवळ रोड, कात्रज देहू रोड, कात्रज टनेल, वाकड हा मार्ग ठरवून देण्यात आला होता. विरुद्ध दिशेने येणारी हवा आणि प्रखर सूर्याप्रकाश सहन करीत त्यांनी यशस्वीरित्या लक्ष पार केले. या इव्हेंटमध्ये पिंपरीच्या 30 सायकलिंस्ट्सनें सहभाग नोंदवला होता आहे.
आदेक्स इंडिया राडोनियार्सतर्फे होमोलोगेशनची प्रक्रिया पुर्ण करून फिनिशर्स मेडल आणि प्रशास्तीपत्रक देण्यात येणार आहे







