पाचोरा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील नांद्रा येथील सामाजिक कार्यकर्ते आनंदा (पेंटर) बाविस्कर हे अनेक वर्षांपासून गरिबांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अहोरात्र झटत आहेत त्यांच्या कार्याची दखल घेत नांद्रा येथील संकल्प फाँउडेशन व नांद्रा ग्रामपंचायतच्या वतीने सन्मान करण्यात आला
या गावात नव्याने पाणी पुरवठा जबाबदारी सांभाळून चार दिवसात गावात पाणीपुरवठा करणारे कर्मचारी संजय बोरसे यांचाही संन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच आशा तावडे, उपसरपंच शिवाजी तावडे, ग्रामपंचायत सदस्य तथा संकल्प फाँउडेशनचे किशोर पाटील, विनोद तावडे, ग्रा.प.सदस्य योगेश सुर्यवंशी, बंटी सुर्यवंशी, भाऊसाहेब बाविस्कर, निर्मला पिंपडे, दिलीप सोनवणे, ग्रामविकास अधिकारी अनिता सपकाळे, क्लार्क जगदीश बाविस्कर, दिलीप तावडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
नांद्रा (ता.पाचोरा) संकल्प फाँउडेशन व ग्रामपंचायतीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते आनंदा बाविस्कर, पाणी पुरवठा कर्मचारी संजय बोरसे यांचा संन्मान करतांना सरपंच आशा ताई तावडे, किशोर पाटील, शिवाजी तावडे, विनोद तावडे, ग्रामविकास अधिकारी अनिता सपकाळे आदी.(छायाचित्र – राजेंद्र पाटील )