जळगाव (प्रतिनिधी) – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष अॅड. संजय राणे यांनी जळगाव येथे एका नाटकानिमित्त आलेले जेष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांचे सदिच्छा भेट घेतली. वयाच्या ७६ व्या वर्षीदेखील चिरतरुण अभिनय करून आजही रंगमंच गाजवणारे आपण नवोदित कलाकारांना प्रेरणादायी आहेत, असे अॅड. संजय राणे यांनी जेष्ठ कलाकार अशोक सराफ यांना सांगितले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने जळगावात ‘व्हॅक्युम क्लिनर” नाटकाच्या कलावंतांचे स्वागत करण्यात आले. तसेच, नाटक संपल्यानंतर सर्व प्रमुख व सहकलाकारांचे उत्कृष्ट अभिनयाबद्दल कौतुक करण्यात आले.