जामनेर ( प्रतिनिधी) – अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची जामनेर तालुका कार्यकारणी आज जाहीर करण्यात आली.

राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडपुरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने एरंडोल विभाग प्रमुख जितेंद्र वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली जामनेरच्या तालुकाध्यक्ष पदी गजानन तायडे यांची नियुक्ती करण्यात आली.
गजानन तायडे हे एम. ए.बी.एड. असून पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची जामनेर तालुक्यात ओळख आहे. शांतताप्रिय ,मनमिळावू , आणि सामाजिक सेवेचा ध्यास असणारे गजानन तायडे संघटनेमार्फत जनतेची,गरिबांची कामे करण्यास आणि अन्याय– अत्याचाराच्या विरोधात कायम प्रयत्नशील असतील यात शंका नाही अशी खात्री त्यांचे निकटवर्तीय देत आहेत .







