जळगावातील चौगुले प्लॉट येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील चौगुले प्लॉट भागातील इसमाने राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी उघड झाली. आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी अशी माहिती नातेवाईकांनी दिली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
योगेश लहानू पाटील (४६, रा. चौगुले प्लॉट, जळगाव) असे मयत इसमाचे नाव आहे. तो आईसह राहतो. भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणारे योगेश पाटील हे चौगुले प्लॉट भागात आईसह राहत होते. त्यांच्या आई दररोज रात्री रामद्वारासाठी मंदिरात जातात व सकाळी घरी येतात. शुक्रवार, २३ फेब्रुवारी रोजी रात्री त्या मंदिरात गेलेल्या असताना घरी एकटेच असलेल्या योगेश यांनी गळफास घेतला. सकाळी सहा वाजता आई घरी परतली त्या वेळी त्यांना मुलाने गळफास घेतल्याचे दिसले.
त्यांनी एकच आक्रोश केला. आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. योगेश पाटील यांना गेल्या काही दिवसांपासून आजार असल्याने त्यांच्यावर औषधोपचारही सुरू होते. आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.