भुसावळ तालुक्यातील सुसरी येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील सुसरी गावात आजाराला कंटाळून तरुणाने झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना दि. २८ रोजी रोजी उघडकीस आली. याप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील सुसरी गावातील रहिवाशी कैलास पाडूरंग पाटील (वय ३७) या तरुणाने आजारपणाला कंटाळून गावाच्या थोड्या अंतरावरील पिंपळगाव शिवारातील आसरा माता मंदिरा कडील जंगलातील एका झाडास सुताच्या दोरीने गळफास लावून आतमहत्या केल्याचे दि. २८ शनिवार रोजी दुपारच्या वेळी हि घटना उघडकीस आली.
या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला रविंद्र बळीराम पाटील यांच्या खबरी वरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास सहा. फौजदार श्रावण जवरे हे करीत आहे.