जळगावात शंकरअप्पा नगर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- घरात सर्व सदस्य असताना वरील मजल्यावर जाऊन महिलेने गळफास घेतला. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी ३ जून रोजी संध्याकाळी घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुनीता प्रदीप पाटील (३८, रा. शंकरअप्पा नगर, पिंप्राळा) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे. मंगळवारी घरातील सर्व सदस्य खालच्या खोलीमध्ये असताना त्या वरील मजल्यावरील खोलीत गेल्या. तेथे त्यांनी गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा बुधवारी मृत्यू झाला. आजाराला कंटाळून त्यांनी गळफास घेतल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रशांत पाठक करीत आहेत.