• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आजार खोटा सांगून गिरीश महाजनांनी मुख्यमंत्र्याचाही केला अवमान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 26, 2023
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आजार खोटा सांगून गिरीश महाजनांनी मुख्यमंत्र्याचाही केला अवमान

आ. खडसे यांची पत्रपरिषद, वैद्यकीय कागदपत्रे केली सादर

एक रुपयांची अब्रुनुकसानीची मंत्र्यांना पाठविली नोटीस

जळगाव (प्रतिनिधी) :- आ. एकनाथराव खडसे यांचा आजार केवळ ढोंग असून त्यांना १३७ कोटींची नोटीस आल्यामुळे ते दवाखान्यात बसले आहेत, असे विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केले होते. त्यावर आ. एकनाथराव खडसे यांनी रविवारी २६ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत त्यांनी, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलचे वैद्यकीय कागदपत्रे देऊन आजाराबाबत माहिती दिली. तसेच, आजार खरा असतानाही तो खोटा असल्याबाबत सांगून समाजात बदनामी केल्याबद्दल मंत्री गिरीश महाजन यांना आ. खडसे यांनी १ रुपयांच्या अब्रुनुकसानीची नोटीस दिली आहे. तसेच, मी आव्हान दिल्याप्रमाणे तुम्हाला जोडे मारायला कधी येऊ ? असा सवालही मंत्री महाजन यांना केला आहे. तसेच, मंत्री महाजनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वैद्यकीय सेवा देणाऱ्या घटकांचा अवमान केल्याचेही आ. खडसेंनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेतील गटनेते आ. एकनाथराव खडसे  नुकतेच हृदयविकाराच्या त्रासातून बरे होऊन बाहेर आले. मात्र त्यांचा आजार खोटा असल्याचे विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केल्यामुळे जळगाव जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे. त्यातून कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरले आहेत. त्यावर आ. खडसे यांनी रविवारी पत्रपरिषद घेतली. मला हृदयविकाराचा झटका आला. त्यातून माझा पुनर्जन्म झाला. असे असताना मंत्री असूनही महाजनांनी बेजबाबदार वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.

आ. खडसे यांनी गिरीश महाजनांना, आजार खोटा असल्याचे सिद्ध करा व मला भर चौकात जोडे मारा असे आव्हान दिले होते. मात्र आता वैद्यकीय कागदपत्रे सादर करून आ. खडसे यांनी गिरीश महाजनांनाच जोडे मारण्याबाबत आव्हान दिले आहे. तसेच त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांना मी घडविले, जे मला बाबा म्हणून हाक मारायचे, त्यांनी बालिशपणाने हे कृत्य केले आहे.

भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिशाभूल करून आंदोलनाला नेले

माझ्या प्रतिमेला जोडे मारणारे अर्ध्याहून अधिक कार्यकर्त्यांना भाजपच्या नेत्यांना दिशाभूल करून टॉवर चौकात नेण्यात आले होते. त्यांना मिटिंगसाठी बोलावण्यात आले होते. नंतर तेथून थेट टॉवर चौकात प्रतिमेला जोडे मारायला सांगण्यात आले. हे कार्यकर्ते अज्ञानी आहे. बालिश आहे. त्यांच्याविषयी मी काही बोलणार नाही, असेही ते म्हणाले.

नोटिशीत काय म्हटले ?

मंत्री गिरीश महाजन यांनी पूर्वी वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून काम केलेले असल्याने त्यांना हृदयविकार आजाराबाबत माहिती नाही. महाजन हे वैद्यकीय तज्ज्ञ नसतानाही बेजबाबदार वक्तव्य करून आ. खडसे यांची बदनामी केली आहे. तसेच, मुख्यमंत्री शिंदे, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांचाही मान ठेवलेला नाही. त्यामुळे नोटीस मिळाल्यापासून ७ दिवसात लेखी व प्रसार माध्यमांसमोर माफी मागावी. यापुढे आ. खडसे यांची बेअब्रू होईल असे वक्तव्य करू नये याची लेखी हमी द्यावी. अन्यथा फौजदारी स्वरूपाचा खटला दाखल करावा लागेल. तसेच अब्रुनुकसानीपोटी प्रतीकात्मक स्वरूपात १ रुपया नुकसान भरपाईसाठी दावा दाखल करावा लागेल असे आ. खडसे यांनी अँड. अतुल सूर्यवंशी व अँड. हरूल देवरे यांच्यामार्फेत नोटीस मंत्री महाजनांना पाठविली आहे.


 

 

Tags: https://kesariraj.com/aajar-khota-sangun-girish-maha/
Previous Post

दुकानाला लागलेल्या आगीत २ लाखांचे नुकसान

Next Post

गुटखा विक्री करणाऱ्या दुकानावर कारवाई ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावळात २ कोटी २७ लाखांचा गुटखा जप्त

गुटखा विक्री करणाऱ्या दुकानावर कारवाई ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon