जळगाव तालुक्यातील कानळदा येथील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शेतात ठेवलेल्या चाऱ्याला आग लागून त्यात ६०० पेंढ्या जळून खाक झाल्या. ही घटना २१ एप्रिल रोजी रात्री कानळदा शिवारात घडली. याप्रकरणी शेतकऱ्याने एका जणावर संशय व्यक्त केला असून, त्याच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तालुक्यातील कानळदा येथील निवृत्ती प्रभाकर बोरोले यांची कानळदा शिवारात शेती आहे. तेथे त्यांनी दादरचा चारा ठेवलेला होता. २१ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास चाऱ्यास आग लागून त्यात ६०० पेंढ्या जळून खाक झाल्या. यामध्ये शेतकऱ्याचे ३६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी शेतकऱ्याने गावातील एका जणाविरुद्ध संशय व्यक्त केला आहे. आगीसंदर्भात तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण इंगळे करीत आहेत.