मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथे शेतकरी धनराज प्रजापती यांच्या गुरांच्या गोठ्याला आज मंगळवारी दि. २१ रोजी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून सहा गुरांचा आगीत होरपळून मृत्यू झाला; तर तीन गुरे जखमी झाले आहे. तसेच तीन ट्रॅक्टर व अन्य शेतीला लागणारे अवजारे जळून खाक झाले असून शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
बेलसवाडी येथे शेतकरी धनराज प्रजापती यांच्या गुरांच्या गोठ्याला आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. शेतकरी धनराज प्रजापती यांना आगीमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले अंतुर्ली दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचाऱ्यांनी माहिती जाणून घेतली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने व अग्निशामक दलाच्या मदतीने आग पहाटेपर्यंत आटोक्यात आणली.दरम्यान, शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे