घटनास्थळी पोलीस निरीक्षक व तहसीलदारांची भेट
पारोळा (प्रतिनिधी) : येथील अमळनेर रस्त्यावरील वंजारी फाट्यासमोरील रोहित जिनिंगला ता.२८ रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास अकस्मात आग लागली. सुमारे ९० लाख रुपयांचा कापूस व इतर साहित्य जळून खाक झाले. यावेळी घटनास्थळी तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे , पारोळा मंडळ अधिकारी निशिकांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, पोलीस कर्मचारी सुधीर चौधरी, अभिजीत पाटील,विजय भोई, राहुल पाटील यांनी भेट दिली.
यावेळी पारोळा ,अमळनेर, एरंडोल येथील अग्निशामक बंब पाचारण करण्यात आले होते. त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. पारोळा अमळनेर रोड रस्त्यावरील रोहित जिनिंग प्रेसिंग मिल प्रायव्हेट लिमिटेड येथे अकस्मात लागल्याचे लक्षात येतात शहरातील सर्व जिनिंग मालक, व्यापारी, शहरातील नागरिक तसेच ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी जिनिंग चालक अनिल सोमानी यांनी सांगितले की, साधारणपणे तीनशे ते साडेतीनशे हजार क्विंटल कापूस जळाल्याचा अंदाज असून सुमारे ९० लाखाचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.