अमळनेर (प्रतिनिधी) : एलपीजी गॅसवर चालणाऱ्या ओमनीला अचानक आग लागून दोन वाहने जळून खाक झाली आहे. तर दोन घरांचे काही साहित्य जळाल्याची घटना शारदा कॉलनीत १७ रोजी सकाळी १० वाजता घडली. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तात्काळ पोहचल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
शहरातील शारदा कॉलनीतील वड चौकातील बाबू गॅरेजवळ गोपाल दिनकर सोनार हा त्याची ओमनी क्रमांक (एम एच १८ बीसी १२८९) मध्ये पत्नीला घेऊन किराणा करण्यासाठी जात होते. वाहन सुरू करताच स्टेअरिंगजवळ अचानक आग लागून गाडीने पेट घेतला. लागलीच आगीने रौद्र रूप धारण केले. नागरिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या नितीन खैरनार , दिनेश बिऱ्हाडे , जफर खान , फारुख शेख , भिका संदानशीव ,वसीम खान यांनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
तोपर्यंत ओमीनी आणि रिक्षा दोन्ही वाहने संपूर्ण जळून खाक झाली होती. आजूबाजूच्या घरांनाही आग लागली काही साहित्य जळाले. सुमारे एक लाखापेक्षा अधिक नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. पोलिसात अकस्मात आगीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.