जळगावातील समर्थ कॉलनीत दुर्दैवी घटना
जळगाव (प्रतिनिधी) – मु.जे. महाविद्यालय समोरील समर्थ कॉलनी परिसरात असणाऱ्या वेणू फार्मसी या औषधीच्या दुकानाला रविवारी २४ ऑक्टोंबर रोजी अचानक आग लागली. महाबळ व गोलाणी मार्केट येथील अग्निशामक दलाचे दोन बंब तातडीने दाखल झाले. पाण्याचा मारा करून २० मिनिटात आग विझविण्यात आली, मात्र तोपर्यंत दुकानातील ८ ते १० लाख रुपयांची औषधी जळून खाक झाली होती.
मू.जे.महाविद्यालय परिसरातील समर्थ कॉलनीत रविवारी रात्री सव्वा अकरा वाजता वेणू फार्मसी या दुकानाला आग लागली. अग्निशमन दलाचे बंब तातडीने दाखल झाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दुकान मालक मिलिंद आनंद चौधरी (रा. दांडेकर नगर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री सव्वा अकरा वाजता मेडिकलमध्ये अचानक शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली. बाहेर धूर व आगीचे लोळ येत असल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी अग्निशमन दल व मालक चौधरी यांना फोन करून माहिती दिली. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात महाबळ व गोलाणी मार्केट येथील अग्निशामक दलाचे दोन बंब तातडीने दाखल झाले. पाण्याचा मारा करून वीस मिनिटात आग विझविण्यात आली, मात्र परंतू दुकानातील आठ ते दहा लाख रुपयांची औषधी जळून खाक झाली होती.
अग्निशमन दलाचे युसूफ पटेल, निवांत इंगळे, मोहन भाकरे, सोपान जाधव, पन्नालाल सोनवणे, राजमल पाटील आदींनी आग विझवली. वेळीच आग विझविण्यात आल्याने शेजारील दुकानांचे नुकसान झाले नाही. बारा वाजेपर्यंत दुकानातून धूर निघतच होता. दरम्यान, रामानंद नगर पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरु होते.