जळगाव (प्रतिनिधी) – रावेर तालुक्यातील बोरखेडा गावाजवळ शेतात मेहताब गुलाबसिंग भिलाला हे गेल्या १० वर्षांपासून सालदारकी करून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवीत होते. त्यांना तीन मुले व दोन मुली असा परिवार होता.
नातेवाइकाईकडे उत्तरकार्य असल्यामुळे आई – वडील व थोरला मुलगा बाहेरगाव गेले असता सविता (वय-१४), राहुल (वय-११), अनिल (वय-८), व सुमन उर्फ नाणी (वय-५) वर्षे असे चोघे भावंडे घरी होते. त्यांची अपरात्री अनोळखी नराधमानानी कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केली. या प्रकरणात कुणाबरोबर मोठया मुलीसोबत अजून काही अनैसर्गिक कृत्य घडले असावे याची पोलीस प्रशासनामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी. व सर्व सत्यता समोर आंत गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्याची मागणी ओल इंडिया आदिवासी अँलोईज फेडरेशन जळगाव जिल्हा कमिटीतर्फे केली. अन्यथा भारतातील समस्त आदिवासी समाज बांधव रस्त्यावर उतरतील, असा इशाराही देण्यात आला.









