जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी आंदोलकांची भेट
जळगाव (प्रतिनिधी) :- आदिवासी कोळी बांधवांच्या न्यायहक्कांच्या मागण्या मान्य होईपर्यंत अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन केले जात आहे. आदिवासी कोळी बांधवांच्या या अन्नत्याग सत्याग्रहास बीआरएस पक्षाने पाठिंबा दिला असून जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी आंदोलकांची शुक्रवारी भेट घेतली. यावेळी त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली.
आदिवासी कोळी समाजाचे पदाधिकारी जगन्नाथ बाविस्कर, नितीन कांडेलकर, संजय कांडेलकर, नितीन सपकाळे, पद्माकर कोळी यांनी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवार दुपारपासून अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू केले. बीआरएस पक्ष म्हणजेच भारत राष्ट्र समिती, महाराष्ट्राच्या वतीने उत्तर महाराष्ट्र सह समन्वयक संदीप खुटे पाटील, उत्तर महाराष्ट्र संघटक अजित नाले, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी या संदर्भातले पत्र उपस्थित कोळी बांधव सत्याग्रहींना सुपूर्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयसमोर न्याय हक्कांच्यासाठी असलेल्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे. यावेळी भगवान धनगर, नरेंद्र पाटील, विजय पाटील, अविनाश भदाणे, भरत पाटील यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.