• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांचा “संघर्ष दिव्यांग मित्र पुरस्कार” देऊन सन्मान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 8, 2022
in खान्देश, जळगाव
0

दिव्यांग अपंग कल्याण बहुद्देशीय संस्था, सामाजिक संघटनांच्या वतीने प्रदान

जळगाव (प्रतिनिधी) – आमच्या जळगावच्या या ‘सिव्हिल हॉस्पिटल’ ला कधी नव्हे इतके सुवर्ण दिवस आपल्या काळात आलेत. तासनतास रांगेत उभे राहणे, गर्दीचा प्रचंड त्रास, लक्ष देणारे कोणी नाही असे दिव्यांग बांधवांचे होणारे विविध हाल थांबल्याने आम्ही आपला गौरव करीत आहोत, अशा भावनिक शब्दात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांचा “संघर्ष दिव्यांग मित्र पुरस्कार” देऊन त्यांच्या कार्याचा विविध संस्थांच्या उपस्थितीत शनिवारी दि. ८ जानेवारी रोजी सन्मान करण्यात आला.

येथील दिव्यांग अपंग कल्याण बहुद्देशीय संस्थेतर्फे आणि सामाजिक संघटनांच्या सहकार्याने जळगावकरांच्या वतीने छोटेखानी कार्यक्रमात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांचा गौरवशाली कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह, शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय गायकवाड, नेत्रशल्यचिकित्सा विभाग प्रमुख तथा आर्या फाउंडेशन अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र पाटील, दिव्यांग अपंग कल्याण बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गणेश पाटील उपस्थित होते.

अध्यक्ष गणेश पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. मानपत्रात त्यांनी सांगितले की, आपणास “संघर्ष दिव्यांग पुरस्कार” देतांना आम्हाला अतिशय आनंद आहे. आपण आमच्या जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येऊन त्याचा कायापालट केला. येथील नियोजन व व्यवस्थापन पारदर्शकपणे करून शिस्तशीर कारभार निर्माण केला. तसेच महाविद्यालय व रुग्णालयात सुशोभीकरण आणि स्वच्छता विषयक केलेल्या कामामुळे त्याची दाखल घेत दिल्लीच्या संस्थेने ‘फेस इंडिया ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ पुरस्कार देऊन रुग्णालयाला गौरविले.

दिव्यांग बांधवांना त्रास न होता दिव्यांग प्रमाणपत्र मिळणे सोईचे व्हावे यासाठी आपण विचारविनिमय करून तसेच सूचना मागवत पारदर्शक कुपन प्रणाली सुरु केली. यामुळे दिव्यांग बांधवाना थेट ‘अपॉइंटमेंट’ मिळाल्याने दिलासा मिळाला. यासोबत दिव्यांग मंडळामधून अनेक चांगले निर्णय घेतले. रुग्णसेवा करताना रुग्णांशी आपुलकीचे संबंध प्रस्थापित करणारे आपण कौतुकास पात्र आहेत. सरकारी दरबारी आपणासारखे कर्तव्यदक्ष, शिस्तशीर आणि कठोर अधिकारी मिळणे हे दुर्मिळ झाले आहे. आपल्या कार्यास सलाम करून आम्ही जळगाववासियांतर्फे करीत असलेला आपला गौरव करीत आहोत.

यानंतर मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल देऊन डॉ. जयप्रकाश रामानंद यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले यांनी संस्थेच्या वतीने मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. रामानंद यांनी पुरस्काराला उत्तरं देताना सांगितले की, दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी राज्यभर अडचणी आहेत. मात्र आपण जळगावात एकही अडचण ठेवली नाही. ‘तत्काळ प्रकरण, लवकर वितरण’ यानुसार दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडविल्या. रुग्णसेवा सुलभ व्हावी यासाठी शिस्तबद्ध रचनेवर कायम भर राहणार आहे.

यावेळी रोहिणी इंगोले, लोकमित्र फाउंडेशनचे शेखर वैद्य, किशोर नेवे, जितू पाटील, अक्षय महाजन, राजेंद्र वाणी, सामाजिक कार्यकर्त्या दीपाली कासार, सचिन पाटील, संताराम एकशिंगे, महाविद्यालय व रुग्णालयाचे जनसंपर्क सहाय्यक विश्वजित चौधरी उपस्थित होते.


 

Tags: #bhusaval #jalgaon
Previous Post

जळगावात आदर्शनगरातील रहिवाशी व्यापाऱ्याची आत्महत्या

Next Post

अरूश्री हॉस्पिटलच्या ऑक्सिजन जनरेटर प्लँन्टचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अरूश्री हॉस्पिटलच्या ऑक्सिजन जनरेटर प्लँन्टचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon