जळगाव (प्रतिनिधी)- देशात सध्या लॉकडाऊन असल्यामुळे पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनायी असतांना पार्टी करणार्या 14 जणांना एमआयडीसी पोलिसांना अटक केली आहे. याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलाभ रोहन यांना माहिती मिळाल्यावरून त्यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक संदीप पाटील यांना सांगुन एमआयडीसी परिसरात एम.सेक्टर-72 येथे पाचापेक्षा अधिक व्यक्ती यांनी जमुन गर्दी केल्याचे कळविले. त्यानुसार पोउनि संदीप पाटील, सफौ अतुल वडनेरे, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, पोहेकॉ. विजय नेरकर, जितेंद्र राजपुत, सतिश गर्जे, गोविंदा पाटील, मुज्जफर काझी, हेमंत पाटील, संदीप पाटील, सचिन पाटील, योगेश बारी आदींच्या पथकाने रात्री 9 वाजेच्या सुमारास 14 जणांना ताब्यात घेतले.
यांना घेतले ताब्यात –
चेतन पाटील, कैलास कोळी, सुरेश सोनवणे, जयेश कोळी, भाईदास ठाकुर, अनिल चव्हाण, सागर बारी, रोहीदास ठाकुर, हेमंत ठाकुर, किसन ठाकुर, कैलास न्हावकर, केशव सुलोणे, सागर कुंभार आणि पंकजसिंह ठाकुर आदींना ताब्यात घेण्यात आले आहे.