लखनऊ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौर्याला संतांकडून विरोध करण्यात येत आहे. त्यांच्या दौर्याविरोधात अयोध्येतील संतांनी दंड थोपटले आहे. संतांचे म्हणणे आहे की, शिवसेना पक्ष हिंदुत्वापासून दूर गेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही असं संतांचे म्हणणे आहे.
अयोध्येतील संत स्वामी परमहंस म्हणाले, ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे. भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा त्यांचा उद्देश होता. आम्ही शिवसेनेला कॉंग्रेस होऊ देणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खुर्चीसाठी काँग्रेससोबत हातमिळवणी केली.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘ज्या दिवशी शिवसेनेने हा निर्णय घेतला त्या दिवशी बाळासाहेबांचे सर्व तत्त्वे मातीत मिळवली. आता ते अयोध्येत येत आहेत, रामभक्ती उद्धव ठाकरेंसाठी फक्त एक शो आहे.
शिवसेनेला जर मतांचे राजकारण कराचे असेल तर, उद्धव ठाकरेंनी मक्काकडे जावे. सर्व रामभक्तांची शिवसेनेने फसवणूक केली आहे. ज्या पक्षाने भगवान राम काल्पनिक आहेत, असे सांगितलं होतं त्याच पक्षासोबत शिवसेनेने युती केल्याचा आरोप त्यांनी केला.
हनुमानगिरीचे पुजारी महंत राजू दास यांनी देखी शिवसेनेला कडक इशारा दिला आहे. ते म्हणाले की, मुस्लिमांना 5 %आरक्षण देणारा शिवसेना पक्ष सतत हिंदुत्वापासून दूर गेला आहे. मुख्यमंत्र्यांना अयोध्येच्या भूमीवर पाय ठेवण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याचे ते म्हणाले.