यावल ;- पेट्रोल पंप लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे .
यावल पासून अंदाजे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या यावल भुसावळ रोडवर पाटाच्या चारी जवळील पेट्रोल पंपावर दरोडा टाकून लुटण्याच्या उद्देशाने तयारी करून हातात शस्त्र घेऊन आढळून आलेल्या एकूण सहा आरोपींना यावल पोलिसांनी 16 गुरुवार रोजी सकाळी दोन पंचेचाळीस वाजता रंगेहात पकडले . वरील सर्व सहा आरोपी भुसावल यावल रोड वरील तापी नदी पुलाजवळ असलेल्या पोलीस चौकी जवळील तसेच टोलनाक्याजवळ असलेल्या रमाबाई आंबेडकर नगर ( अकलुद ता.यावल ) मधील असल्याने यावल भुसावल तालुक्यासह संपूर्ण भुसावळ विभागात एकच खळबळ उडाली असून दरोडेखोर आरोपी पकडले गेल्याने यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे व त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
अंजाळे घाटात गेल्या पंधरा दिवसात रस्ता लुटीचे दोन दोन प्रकरणे झाली आहेत तक्रारीनुसार एक गुन्हा दाखल झाला असून त्यात सुद्धा काही आरोपी अटक झालेले आहे, अशा परिस्थितीत आज दिनांक 16 एप्रिल 2020 गुरुवार रोजी सकाळी दोन पंचेचाळीस वाजता यावल पोलीस निरीक्षक अरूण धनवटे पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय देवरे व त्यांचे सहकारी पोलीस मित्र यावल भुसावळ रोडवर गस्त घालीत असताना यावल भुसावल रोड वरील पाटाच्या चारी जवळील घोडे पिर बाबा दर्गा चे दरम्यान यावल शहरापासून अंदाजे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकून लुटण्याच्या उद्देशाने तयारी करून हातात कुर्हाड, चाकू, सुरा, लाकडी दांडे, दोरी, मिरची पावडर इत्यादी साहित्यासह मनोज रमेश सपकाळे वय 20, गोलू उर्फ धम्मरत्न दिगंबर धुरंदर वय 18, विशाल भाऊलाल साळवे वय 19, गणेश उर्फ अजय जनार्दन सोनवणे वय 19, संदीप आत्माराम सपकाळे वय 21, शिव हरी बागडे वय 18 , हे एकूण सहा संशयित दरोडखोरआरोपी मिळून आले.
सर्व सहा आरोपी हे भुसावल येथील तापी नदी पुलाजवळील टोल नाका व पोलिस चौकीजवळ असलेल्या भुसावल यावल रोडवरील रमाबाई आंबेडकर नगर अकलूज तालुका यावल येथील आहेत, रमाबाई आंबेडकर नगर पासून अंजाळे घाट हा दोन-तीन किलोमीटर अंतरावर आहे, तसेच रमाबाई आंबेडकर नगरपासून भुसावळ यावल रोडवर एकमेव असलेल्या पेट्रोल पंप अंदाजे 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे या पेट्रोल पंपावर दरोडा टाकून लुटण्याच्या प्रयत्नात असलेल्या सहा दरोडेखोरांना यावल पोलिसांनी ताब्यात घेतल्याने संपूर्ण भुसावळ विभागात यावल पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.
वरील सहा आरोपी विरुद्ध यावल पोलीस स्टेशनला भाग 5 गु. र. नं. 66 / 2020 भा.द.वि. कलम 399 सह शस्त्र अधिनियम 4 / 25 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एस. आय. सुनिता कोळपकर या करीत आहेत.