जळगाव (प्रतिनिधी ) ;– तरूणाची मोटारसायकल राहत्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीला आला. याप्रकरणी सायंकाळी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल श्रीराम सोनवणे (वय-३०) रा. कोळीपेठ, कांचननगर जवळ हे एमआयडीसीतील खासगी कंपनीत कामाला आहे. कंपनीत जाण्यासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ बीएन ५८९८) क्रमांकाची मोटारसायकल आहे. ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ते कामावरून मोटारसायकलने घरी आले. मोटारसायकल मित्र राजू सोनवणे यांच्या घरासमोर पार्किंगला लावली होती. ८ फेब्रुवारी सोमवारी सकाळी ८.३० वाजता दुचाकी जागेवर दिसून आली नाही. त्यांनी परिसरात व मित्र मंडळींशी विचारपूस केली मात्र दुचाकी मिळून आली नाही. मोटारसायकल धारक अनिल सोनवणे यांच्या फिर्यादीवरून रात्री उशीरा शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मनोज येऊलकर करीत आहे.