माजीमंत्री गिरीश महाजन यांचे मुख्यमंत्र्याना निवेदन
जळगाव ;- शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दि. १८ मे २०२० रोजी परिपत्रक काढुन राज्यातील राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांचे माहे मे २०२० च्या वेतनातील एक किंवा दोन दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये देणगी म्हणुन उपलब्ध करुन देण्याबाबत आदेश
देण्यात आलेले आहेत.मात्र कोरोनासाठी रात्रदिवस काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातुन एक किंवा दोन दिवसांचे वेतन कपात करू नये अशा आशयाचे निवेदन माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे. निवेदनात म्हटले आहे कि ,
तसेच या आदेशात यामध्ये या कर्मचाऱ्यांची वेतन कपात करण्यास संमती नसेल तर त्यांनी तसे कळवावे असे
देखील नमुद केलेले आहे. वास्तविक पाहता कोरोना विरुध्दच्या युध्दा मध्ये जे डॉक्टर्स , नर्सस , पोलीस , सफाई कर्मचारी स्वत:चे जीव धोक्यात घालुन रात्रंदिवस मेहनत घेत आहेत त्यांना कोरोना ची बाधा होत आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र वैद्यकिय सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे असतांना अशा
प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात नाही. त्यांना या कामाच्या बदल्यासाठी प्रोत्साहन भत्ता देणे अपेक्षित आहे. प्रोत्साहन भत्ता देणे तर दुरच पण रात्रंदिवस काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातुन ऐच्छिक का होईना एक किवा दोन दिवसाचे वेतन कपात करणे योग्य होणार नाही , यामुळे कोराना युध्दात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष आहे. उलट सदर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता देणे बाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा. व सदर कर्मचाऱ्यांच्या पगारातुन कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये अशी विनंतीही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे .