जळगाव – तालुक्यातील शिरसोली येथे गरजू कुटुंबियांना सामाजिक बांधिलकीतून समाज सेवक श्री.ललित पैलानी ,श्री.मंगेश गरजे,श्री.दिपेश हेडहाऊ आदींनी जीवनावश्यक वस्तूंच्या साहित्याचे वाटप केले.
यावेळी गरजू कुटुंबियांच्या चेहर्यावर समाधानाचे हास्य उमटले होते . किराणा साहित्य वाटप प्रसंगी भगवान सोनार , विकास पाटील, चेतन सोनार , संदीप जाधव, ललित बडगुजर , अजय चांदेलकर , प्रमोद पाटील , सलमान शेख, भरत मिस्तरी, राहुल देशपांडे , पुरुषोत्तम गायकवाड आदी उपस्थित होते , या किराणा साहित्यामध्ये गहू,तांदूळ,तेल, मीठ , मिरची साखर चहा ,हळद , साबण , डाळ आदी साहित्यांचा समावेश होता.
——————–