अमळनेर;- न पा च्या नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी शहरात वाढत चाललेल्या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री जळगांव गुलाबराव पाटील, यांना निवेदन देऊन मागणी केली.
अमळनेरात वाढता कोरोनाचा प्रभाव पाहता परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज अमळनेरात येऊन संपूर्ण आढावा घेतला. याप्रसंगी कामगार नेते रामभाऊ संदानशिव, माजी आमदार साहेबराव पाटील, शिवसेना नेते डॉ पिंगळे, भूत बापू, अमळनेर नगरपरिषदचे पुष्पलता पाटील उपस्थित होते.
अमळनेरच्या क्षेत्रामध्ये बाहेरूनयेणा-यांमुळे कोरोनाचे वाढते आकडे समह संसर्गाच्या दिशेने जात असल्याने यापुढेही
जास्त काळजी घेणे आवश्यक असल्यामुळे कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भावामुळे पसरलेल्या रोगराई वर नियंत्रित करण्यासाठी व निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी आपल्या स्तरावरून अमळनेर नगरपरिषद अमळनेरसाठी रुपये 50 लक्ष एवढा निधी मिळणेसाठी
अमळनेर न पा च्या नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे.
पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांनी त्यांचा मुलगा प्रताप गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भानूबेन गोशाळेला एक दिवसाचा जेवणाचा खर्च रुपये 1 लाख 10 हजार रुपयांची मदत केली आहे. पालकमत्र्यांसह आमदार व माजी आमदारांनी परतताना शेवटी प्रतिबंधित क्षेत्र असलेला साळीवाडा व त्या परिसराची पाहणी करून दक्षतेबाबत सूचना दिल्या