पुणे | पुण्यातील नऱ्हे गावात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीकडून पतीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. पुण्याजवळच्या नऱ्हे गावात हे थरारक हत्याकांड घडलं आहे. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोघांमधील वादामुळे पत्नीने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. हत्येमागचे नेमके कारण अद्याप पुढे येऊ शकलेले नाही.