तीन जण ताब्यात ; जळगाव -शिरसोली रोडवर केली सापळा रचून कारवाई
जळगाव ;- एका वाहनातून पाचोऱ्याकडे एका वाहनातून काही लाखांची रक्कम जात असल्याच्या गुप्त माहितीवरून जळगावच्या एमआयडीसी पोलिसांनी सापळा रचून एका क्रूझरमधून तीन जण २९ लाखांची रोकड घेऊन जात असल्याच्या कारणावरून तिघांना रोकडसह पोलिसांनी शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमाराला घडली असून रक्कम कपाशी विक्रीतून आलेली असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे . याबाबत अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नसल्याचे सांगण्यात आले .
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , 20 जून रोजी रोजी पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांना माहीती मिळाली होती की, शिरसोली रोडने मोठी रक्कम पाचोरा शहराकडे जाणार आहे. त्यानुसार पो.नि लोकरे यांनी स.फौ. अतुल वंजारी, स.फौ. आनंदसिंग पाटील, स.फौ. रामकृष्ण पाटील, पो.कॉ. हेमंत पाटील, पो.कॉ. सचिन पाटील, पो.कॉ. समाधान पाटील, पो.कॉ. योगेश बारी, पो.कॉ. मुदस्स्र काझी यांचे पथक कारवाई कामी रवाना केले. शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील शिरसोली रोडवरील हॉटेल ग्रॅपीज जवळ जळगाव कडुन क्रुझर कार क्रमांक (एम.एच. 13 ऐसी 7463) ही येतांना दिसली. वाहन चालकाच्या हालचाली संशयास्पद दिसल्याने सदर वाहन पोलीस पथकाने थांबविले. यावेळी वाहनात बसलेले ३ इसम नामे 1) अंकुश रमेश पाटील (वय 28 वर्ष, रा. सार्वे पिंपरी, ता. पाचोरा जि. जळगाव) 2) रोशन निसार पटेल (वय 22 वर्ष, रा. सार्वे पिंपरी, ता. पाचोरा जि. जळगाव) 3) निलेश राजेंद्र कुमावत (वय 25 वर्ष, रा. सातगाव डोंगरी, ता. पाचोरा, जि. जळगाव) असे होते. त्यांच्याकडे वाहनाची कागदपत्र नसल्यामुळे क्रुझरची कसुन तपासणी करण्यात आली.दरम्यान हि रक्कम कशी आली याचा पोलीस तपस करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले पुढील तपास स.फौ. रामकृष्ण पाटील करीत आहे.