एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव ;– शहरातील कंजारवाडा परिसरात ३० मार्च २०२० रोजी एकावर दारूच्या विक्री करीत असल्याच्या कारणावरून आरोपीना या गोष्टीचा राग आल्याने तिघांनी एकावर डोक्यात तलवार मारून त्याला जखमी केल्याची घटना घडली होती . या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता . गुन्हा दाखल झाल्यापासून तीन आरोपी फरार होते . त्यांना १५ मे रोजीच्या मध्यरात्री तिघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. मात्र यातील अक्षय नेतलेकर हा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , फिर्यादी सचिन अभंगे (वय २७ ) रा. कंजारवाडा याला आरोपी बबलु उर्फ विजय आधार नेतलेकर प्रितेश उर्फ पिंटु आधार नेतलेकर , सुरज आधार नेतलेकर सर्व राहणार कंजरवाडा,संजयगांधी नगर,जळगाव या तिघांनी ३० मार्च रोजी सचिन अभंगे यांच्या डोक्यात तलवार मारून त्याला गंभीर दुखापत केली होती . गुन्हा घडल्यापासून आरोपी फरार होते . मात्र एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायकराव लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त माहिती नुसार उपनिरीक्षक विशाल वाठोरे ,पो.काॅ/हेमंत रघुनाथ कळसकर, पो.काॅ/चंद्रकांत बळीराम पाटील आदींच्या पथकाने वरील तीन आरोपीना १५ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास अटक करून त्यांना ताबयात घेण्यात आले आहे . पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल वाठोरे करीत आहे .