निंभोरा बु।। ता रावेर : येथील रहिवासी व ह.मु.फैजपुर येथील ज्येष्ठ पत्रकार व माजी ग्रा. पं. सदस्य भास्कर दौलत महाले यांचा मुलगा सुधीर भास्कर महाले यांचे दि.२० रोजी धानोरा येथे अपघातात मृत्यू झाला असून तिसऱ्या दिवशीच भास्कर महाले यांच्या पत्नी व अपघातात मृत्युमुखी पडलेला सुधीर महाले यांची आई मंगला भास्कर महाले वय ५५ यांना पुत्रविरहाचा धका बसल्याने त्यांचे दि २२ रोजी निंभोरा येथे निधन झाले .त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सुन ,नातवंड असा परिवार आहे .