जळगाव ;- भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगराची जिल्हा कार्यकारिणी जाहीर झालेली असून आता महानगरच्या अंतर्गत विविध आघाड्यांच्या अध्यक्ष निवड घोषित करण्यात येत असून यामध्ये नुकतीच ओबीसी आघाडीच्या अध्यक्ष पदी जयेश प्रकाश भावसार यांची अध्यक्ष पदी जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांनी निवड नुकतीच जाहीर केली आहे.
जयेश भावसार यांचे शिक्षण बी.ई.कॉम्प्युटर झाले असून १९९० पासून भारतीय जनता पार्टीचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम केले आहे. तसेच ते निर्मल फौंडेशन चे अध्यक्ष आहेत व प्रधानमंत्री प्रचार प्रसार अभियानाचे उत्तर विभागीय युवक अध्यक्ष सुद्धा होते व मागच्या वर्षी ओबीसी मोर्चा मध्ये उपाध्यक्ष सुद्धा होते तसेच २०१९ विधानसभा निवडणुकी मध्ये त्यांनी साहित्य प्रमुख ची जब्बब्दारी त्यांच्यावर होती.
त्यांच्या या निवडीबद्दल माजी मंत्री आमदार गिरीश भाऊ महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटन मंत्री.अॅड. किशोर काळकर, आमदार सुरेश भोळे (राजूमामा), ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे, खा. उन्मेष पाटील, खा.रक्षाताई खडसे, बेटी बचाव बेटी पढाव डॉ. राजेंद्र फडके, आमदार स्मिता ताई वाघ, आमदार चंदू भाई पटेल, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, महापौर भारती ताई सोनवणे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, स्थायी सभापती सुचिता हाडा यांनी आभिनंदन केले.