अमळनेर;- येथिल आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळातर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामूहिक वर्गणीतून समाजातील गरजू कुटुंबाना लॉक डाऊन च्या पार्श्वभूमीवर किराणा वाटप करून जयंती साजरी करण्यात आली.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर देशात ३ मे पर्यंत लॉक डाऊन असल्यामुळे गोर,गरीब,कष्टकरी कुटुंबातील लोकांना आदिवासी ठाकूर समाज मंडळातर्फे सामाजिक कार्यकर्त्यांनी सामूहिक देणगीतून मदत गोळा करून किराणा किट वाटप केले.डॉ बाबासाहेब आंबेडेकर जयंतीनिमित्त गरजू समाज बांधवांना मदत करण्याचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.सोशल डिस्टसिंग पाळत गरजू कुटुंबियांना घरपोच किराणा साहित्य पुरवण्यात आले.सोबत रोजच्या स्वच्छतेसाठी,हात धुण्यासाठी आधार संस्थेच्या माध्यमातून साबण ही देण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे,ठाकूर समाज अध्यक्ष दिलीप ठाकूर,प्रकाश वाघ,संजय ठाकूर, जितेंद्र ठाकूर,चंद्रशेखर ठाकूर,रविंद्र वानखेडे,विजय ठाकूर आदिनी परिश्रम घेतले.अमळनेर ठाकूर समाजातील अनेक दात्यांनी उत्स्फूर्तपणे देणगी देत समाजातील बांधवाना मदतीचा हात देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सार्थक केली.