चाळीसगाव ;- कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामपंचायतींच्या मार्फत अनेक भागात फवारण्या केल्या जात आहेत मात्र त्या फवारणीसाठी योग्य ते औषध वापरले जात नसल्याचे दिसून येते तसेच त्यासाठी आवश्यक असे सोडियम हायपोक्लोराईड हे औषध मिळत नसल्याने अनेक ग्रामपंचायतीना नाईलाजाने TCL फवारणी करावी लागत आहे. ही बाब आमदार मंगेश चव्हाण यांच्या लक्षात आली असता त्यांनी आपल्या शिवनेरी फाउंडेशन व भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीना सोडियम हायपोक्लोराईड औषधी मोफत उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागातील निर्जंतुकीकरण अधिक प्रभावीपणे होणार आहे.
सदर सोडियम हायपोक्लोराईड औषधी ही भाजपच्या पदाधिकारी यांच्यामार्फत प्रत्येक गावात पोहचवली जात आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात भाजपा पदाधिकारी विलास पाटील व राम पाटील यांनी माळशेवगे, ब्राम्हणशेवगे, अंधारी, तमगव्हाण, हिरापूर, डोणदिगर, चिंचखेडे, आडगाव, शेवरी या गावांना तर भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुनील पवार, भटक्या विमुक्त आघाडी तालुकाध्यक्ष तथा करगाव गावाचे सरपंच दिनकर राठोड, सरपंच संघटनेचे डॉ.महेंद्र राठोड यांनी तळेगाव व कृष्णानगर तांडा, राजदेहरे गावठाण, पिंपळगाव, घोडेगाव, जुनपानी, करगाव, चैतन्य तांडा, इच्छापूर तांडा नंबर ४, हातले, वाघले, कोंगानगर, सेवानगर तांडा, लोंढे तांडा, विसापूर, चिंचगव्हाण आदी गावांना भेट देत सोडियम हायपोक्लोराईड औषधीची कॅन, व आमदार मंगेश चव्हाण यांचे गावाचे सरपंच यांना कोरोना प्रतिबंधासाठी घ्यावयाच्या उपाययोजना व आवाहन करणारे पत्र दिले.
तसेच चाळीसगाव येथील अंत्योदय या जनसेवा कार्यालयात पिंपळवाढ म्हाळसा, उंबरखेड, वाकडी, शिंदी, चत्रभुज, खरजई, देवळी, हिंगोणेसीम, रोहिणी, जामदा, बोरखेडा बु., गणेशपूर, खडकी बु., बोरखेडा खुर्द, चाळीसगाव शहर पोलीस, कोदगाव, वाघडू, टाकळी प्रदे, टेकवाडे, बिलाखेड, वाघळी, शिरसगाव, जुनोने, लोंढे, दडपिंप्री, गणपूर तांडा, तांबोळे, पाटणा, पिलखोड, तामसवाडी, उपखेड, ओढरे, टाकळी प्रचा आदी गावांचे सरपंच किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना सदर औषधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राहिलेल्या गावांना भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे स्वतः गावात जाऊन औषधी पुरविणार असल्याची माहिती भाजपा सरचिटणीस अमोल चव्हाण यांनी दिली.