नगरदेवळा ता पाचोरा येथे एक हजार एकरात “टेक्सटाईल पार्क” साकारण्याचा दिशेने केंद्र सरकारचे एक पाऊल
चाळीसगाव — जळगाव लोकसभेचे तडफदार खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज लोकसभेतील चर्चेत परकीय गुंतवणूक देशात येऊन वस्त्रोद्योग क्षेत्रात मेगा “टेक्सटाईल पार्क” सुरू करण्याची काय योजना आहे.त्याची महाराष्ट्रात काय स्थिती आहे. असा प्रश्न उपस्थित केला .यावर केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृतीजी इराणी यांनी उत्तर दिले की केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयांच्या माध्यमातून महाराष्ट्रात टेक्स्टाईल्स पार्क सुरू करणेसाठी केंद्र सरकार आग्रही असून राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसादाची गरज असल्याचे माहिती दिली.
जळगाव जिल्हा हा कापूस उत्पादनात महाराष्ट्रात अग्रेसर असून देशात धागा व कापड निर्मिती मध्ये महाराष्ट्र आघाडीवर असून टेक्स्टाईल्स पार्क ची महाराष्ट्रात गरज आहे.हा मुद्दा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी संसदेत मांडला.
राज्यात एकमेव टेक्स्टाईल्स पार्क खान्देशात साकारणार ….!
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील रेल्वे स्टेशनलगत एक हजार एकरात हा टेक्सटाईल पार्क सुरू करावा यासाठी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपासून ते थेट मुख्यमंत्री मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पर्यंत राज्य शासनाने सकारात्मक सहकार्य करावे अशी मागणी लावून धरली होती. तसेच या टेक्सटाईल पार्क मुळे जवळच्या विदर्भ आणि मराठवाडा लगतच्या क्षेत्राला मोठा फायदा होईल.यासाठी हा टेक्सटाईल पार्क येथे होण्यासाठी खासदार उन्मेश दादा पाटील आग्रही असून या टेक्सटाईल पार्क मुळे या भागाचा कायापालट होणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याने या टेक्सटाईल पार्क कडे खान्देशवासीयांचे लक्ष लागून आहे. तसेच खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या धडाडीचे कौतुक केले जाते आहे.