दुबईहून परतलेल्या चीनच्या तीन पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांची तपासणी करून नमुने प्रयोगशाळेत पाठवले होते, त्याचा अहवाल आला असून या तिघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
दुबईत पर्यटनासाठी तब्बल 48 जण गेले होते, ते गेल्या आठवड्यात हिंदुस्थानात परतले. त्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. या दोघांसह बीड जिल्ह्यातील तीन पर्यटकही दुबई पर्यटनासाठी गेले होते. बीडमध्ये परतल्यानंतर आरोग्य विभागाने त्यांची तपासणी केली. मात्र, त्यांच्यात कोणतेही लक्षण आढळले नाही. तरीही खबरदारीचे उपाय घेण्यात येत होते. त्यांची चाचणीही करण्यात आली. या चाचणीत त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचं निष्पन्न झालं.