जळगाव ;- आज सकाळी गोलाणी मार्केटमध्ये अन्न व औषध विभागाच्या पथकाने फळांच्या दुकानांवर धडक कारवाई केली. यात काही फळ नमुना म्हणून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
शहरातील गोलाणी मार्केटमध्ये मोसंबीचा केलेला साठावर रासायनिक स्प्रे मारला जातोय तर इतर फळांवर रासायनिक प्रक्रिया करून पिकविले जात होती. या अन्न व औषध प्रशासनामार्पâत कारवाई करण्यात आली. मनपा आणि अन्न व औषध विभागाच्या पथकाने आज सकाळी ९ वाजता गोलाणी मार्केटमधील दोन फळविक्रेते यांच्या दुकानावर धडक कारवाई करुन पथकाने गोडावूनची संपुर्ण तपासणी केली, त्यात जिल्ह्यासह राज्यात कोरोना विषाणूने मान वर केली आहे. त्यातच सणाचा गैरफायदा घेत शहरातील फळविक्रेते मोठ्या प्रमाणावर कमी कालावधीत फळ पिकविणे कठीण असल्याने घातक रसायन वापर फळांना आकर्षक, टवटवित ठेवण्यासाठी करत आहे. आंब्याची वाढती मागणी लक्षात घेऊन अनेक विक्रत्यांनी आंबा पिकविण्यासाठी कार्बाइडचा मारा करत असल्याचा व्हिडीओ सामाजिक कार्यकत्र्या वंदना पाटील, रेखा पाटील यांना व्हॉट्सअॅप वर आला. त्यानुसार त्यांनी आरोग्य विभागाला कळविण्यात आले होते. आरोग्य अधिकारी चौकशी करण्यासाठी गेले असता फळविक्रेत्यांची दुकाने बंद दिसून आले.
आज सकाळी अन्न व औषधी प्रशासन आणि मनपा यांनी संयुक्तपणे आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केटमधील दोन फळविक्रेत्यांची दुकाने तपासली. दुकानातील मोसंबी आणि काही फळे नमुना म्हणून घेवून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषधी विभागाच्या अधिकारी महाजन यांनी सांगितले.